शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाढता मानवी हस्तक्षेप सारिस्का-रणथंबोरच्या मुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:34 IST

वाढती लोकसंख्या आणि देवीची जत्रा यामुळे सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. रणथंबोर अभयारण्यातली व्याघ्रसंख्या झपाट्याने वाढली असून तेथील वाघांना स्थलांतरित करावे लागणार आहे.

- राजू नायकसारिस्का (राजस्थान) : वाढती लोकसंख्या आणि देवीची जत्रा यामुळे सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. रणथंबोर अभयारण्यातली व्याघ्रसंख्या झपाट्याने वाढली असून तेथील वाघांना स्थलांतरित करावे लागणार आहे. मात्र, पर्यटन लॉबीच्या दबावामुळे हे स्थलांतर अडले आहे.‘सारिस्का व रणथंबोर ही दोन्ही अभयारण्ये एकमेकांना निकट असल्यामुळे वाघांचे स्थलांतर करण्यात नैसर्गिक अडचणी नाहीत,’ अशी माहिती डेहराडून येथील ‘भारतीय वन्यजीव संस्थान’च्याप्राणी पर्यावरण आणि संवर्धन जीवशास्त्र विभागाचे प्रमुख यादवेंद्र झाला यांनी ‘लोकमत’लादिली.हा प्रकल्प आता ६ बछड्यांसह १९ वाघांचे निवासस्थान बनला आहे. २००५ मध्ये सारिस्का अभयारण्यातून ४ वाघ नाहीसे झाल्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली होती. मात्र, त्यानंतर २००८ साली रणथंबोरमधून वाघांच्या दोन जोड्या स्थलांतरित करण्यात आल्या. आणखी दोन वर्षांनतर वाघांच्या २ मादी येथे सोडण्यात आल्या. सध्या येथील वाघांची संख्या १९ आहे. तरीही गेल्या वर्षभरात येथे ३ वाघांचा झालेला मृत्यू ही वनाधिकाऱ्यांच्या चिंतेची बाब बनली आहे.यादवेंद्र झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिस्कामध्ये दर मंगळवारी व शनिवारी उत्सवासाठी १००हून अधिक वाहने येत असतात. धार्मिक कारणांमुळे त्यांच्या संख्येवर निर्बंध लादणे शक्य होत नाही. शिवाय दररोज पर्यटकांच्या किमान ३० जीप्स येथे येत असतात.मात्र, स्थानिकांचा हस्तक्षेप, भाविकांच्या भोजनावळी आणि वाढत चाललेल्या मानवी वस्त्या या अभयारण्याच्या प्रमुख समस्याबनल्या आहेत. सारिस्कातून याआधी दोन वेळा मानवी वस्त्या हटविण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यावर होणारा खर्च ही योजना आणखीन वेगाने राबविण्यात अडचणी निर्माण करतो.अपुरे सुरक्षा कर्मचारीसारिस्काचे क्षेत्रफळ पाहाता, येथे किमान ४०० सुरक्षाकर्मींची आवश्यकता आहे. परंतु, प्रत्यक्षात येथे १४० सुरक्षा रक्षकांना मंजुरी मिळाली असून त्यातील जेमतेम १००जण कामावर असतात. वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या गळ्यात जी कॉलर बसविण्यात येते ती जर्मनीतून साडेतीन लाख रुपये मूल्य देऊन आयात करावी लागते. ती चार वर्षे चालते. देशभरात एकूण ३० वाघांना अशा प्रकारची कॉलर बसविण्यात आली आहे. रणथंबोरमध्ये वाघांच्या वाढलेल्या संख्येने समस्या निर्माण केल्या आहेत. या उद्यानाचा विस्तार ३९२ चौ. किमी.मध्ये असून त्याचे बफर क्षेत्र १३४२ चौ. किमी. आहे. मात्र, प्रत्यक्षात इथल्या वाघांचा वावर ६०० चौ. किमी. क्षेत्रात असतो. १९८२ साली येथे ४४ वाघ होते. २०१९ मध्ये ती संख्या ७४वर गेलेली आहे. वाढत्या संख्येमुळे वाघ मानवी वस्तीत शिरकाव करीत आहेत.

टॅग्स :Tigerवाघ