शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण वाढल्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 17:50 IST

विविध कंपन्यांचे संकेत : अमेरिकेतही कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याच्या सूचना

ठळक मुद्देआयटी कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच सप्टेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्याची तयारी सुरू आहे.

नवी दिल्ली : देशातील लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे भारतातील आयटी कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ संपविण्याच्या विचारात आहेत. लवकरात लवकर कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेण्याच्या सूचना कंपन्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस ७० ते ८० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्याचे नियोजन सुरू आहे. अमेरिकेतही सर्वच क्षेत्रातील कंपन्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कार्यालयात बोलाविण्याची तयारी केली असून, तशा सूचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

आयटी कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच सप्टेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्याची तयारी सुरू आहे. सुरुवातीला ७० ते ८० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्याचे नियोजन करीत असल्याचे टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. तर गुगल, ॲमेझॉन यासारख्या कंपन्यादेखील  लसीचे दाेन डोस झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

अमेरिकेत कामावर बोलाविण्याची घाईअमेरिकेत सर्वच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यास सुरुवात केली आहे. बँका तसेच वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांनी संपूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून कामावर बोलाविले आहे, तर काही कंपन्यांनी ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले आहे. 

टॅग्स :Socialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या