‘कृषी क्षेत्रत संशोधनाचा वापर वाढवा!’
By Admin | Updated: July 30, 2014 01:37 IST2014-07-30T01:37:22+5:302014-07-30T01:37:22+5:30
कृषी क्षेत्रच्या भरभराटीसाठी संशोधनाचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या अनुषंगाने ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या घोषवाक्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

‘कृषी क्षेत्रत संशोधनाचा वापर वाढवा!’
नवी दिल्ली : कृषी क्षेत्रच्या भरभराटीसाठी संशोधनाचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या अनुषंगाने ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या घोषवाक्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
शेतकरी आपल्या उत्पन्नात भर घालण्यासाठी उत्पादन वाढवू शकला पाहिजे तसेच त्याच्यात देशासोबतच जगाची भूक भागवण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, असे मोदी म्हणाले. नैसर्गिक स्नेत घटणो आणि हवामान बदलाच्या आव्हानांबद्दल काळजी व्यक्त करताना ‘कमी जमीन आणि कमी वेळेत’ कृषी उत्पादन वाढण्यासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर होणो गरजेचे आहे. हरित आणि श्वेतक्रांती प्रमाणोच आता मत्स्यपालन क्षेत्रत नील क्रांतीची आवश्यकता आहे. आपल्याला दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतील. एक म्हणजे आम्ही आमच्या शेतक:यांना संपूर्ण देश आणि जगाला अन्नधान्य पुरविण्यासाठी सक्षम करू शकतो आणि दुसरे असे की, कृषी क्षेत्रतून आमच्या शेतक:यांना पुरेसे उत्पन्न मिळू शकते, असेही ते म्हणाले.