गोव्यात विवाहित महिलांच्या छळात वाढ
By Admin | Updated: September 21, 2014 02:26 IST2014-09-21T02:26:04+5:302014-09-21T02:26:04+5:30
प्रगत, सुशिक्षित व आधुनिक विचारसरणीसाठी एकीकडे हे राज्य ओळखले जात असले तरी दुसरीकडे महिलांच्या कौटुंबिक छळाचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

गोव्यात विवाहित महिलांच्या छळात वाढ
सोनाली देसाई - पणजी
पंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात साक्षरतेचे प्रमाण 83 टक्के आहे. प्रगत, सुशिक्षित व आधुनिक विचारसरणीसाठी एकीकडे हे राज्य ओळखले जात असले तरी दुसरीकडे महिलांच्या कौटुंबिक छळाचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
साधारण 5-10 वर्षापूर्वी गोव्यात विवाहित महिलांचा हुंडय़ासाठी छळ होत असे. आता मात्र पती-पत्नीच्या संसारात कुटुंबाचा हस्तक्षेप वाढल्याने वाद होत आहेत तसेच कौटुंबिक अत्याचार वाढू लागले आहेत. गोव्यात महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण 30 टक्के आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात वर्षाला साधारणपणो 60-70 तक्रारींची नोंद होते.
सुशिक्षित गोमंतकातही सासू, नणंद यांच्याकडून होणा:या अत्याचाराच्या गेल्या सहा महिन्यांत महिला आयोगाकडे 103 तक्रारी आल्या आहेत.
महिलाच महिलांवर अत्याचार करीत असल्याने दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न पडतो. पत्नीचा पतीकडून छळ होणो, मारहाण होणो अशा तक्रारींची संख्या आता कमी झाली आहे. मात्र महिला आयोग, पोलीस स्थानके व बिगर सरकारी संस्थांत सासू आणि नणंदेकडून होणा:या छळांच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
दोनच अपत्य असलेल्या कुटुंबात भावाचे लग्न झाल्यानंतर मुलगी पतीसह पुन्हा माहेरी राहायला येते. भावजय नोकरी करणारी असल्यास तिला सहकार्य करणा:या आईचे कान भरून भावजयीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात येतो, असे या क्षेत्रत काम करणा:या कार्यकत्र्याचे म्हणणो आहे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भाग आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळीच्या शिकार होत असत, आता उच्च आणि सुशिक्षित कुटुंबातही अशी प्रकरणो घडत असल्याचा निष्कर्ष आयोगाकडे आलेल्या तक्रारींवरून काढता येतो.
च्आई-वडील आणि मुलगा अशा त्रिकोणी कुटुंबात सून आल्यानंतर आईला आपला मुलगा आपल्यापासून दूर चालला आहे, असे वाटते. सुनेला त्रस दिल्याने मुलगा आणि सुनेत वादविवाद होऊन मुलगा पूर्वीप्रमाणोत सर्व गोष्टी मला सांगेल.
च्त्याचप्रमाणो बायकोशी भांडण झाल्यामुळे तो आपल्याला जास्त वेळ देईल, अशी काही महिलांची मानसिकता असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणो आहे. मुलाच्या विवाहित आणि अविवाहित बहिणी भावाच्या संसारात हस्तक्षेप करीत असल्याची प्रकरणोही नोंद झाली आहेत.
अहंकाराचा अडसर : पती-पत्नी दोन्ही कमविणारे असल्याने माघार घेणो किंवा समजूतदारपणा दाखविण्याची तयारी होत नाही. नोकरीमुळे परावलंबित्व संपल्याच्या भावनेने आणि आर्थिक सक्षमतेमुळे पती-पत्नीत वाद झाल्यावर प्रकरणो थेट घटस्फोटार्पयत जात आहेत. त्यातच आत्मकेंद्रित कुटुंब व्यवस्थेमुळेही कौटुंबिक अत्याचारांत वाढ होत आहे.
हस्तक्षेपामुळे घटस्फोट
वाद झाल्यानंतर तोडगा काढण्यास काही जोडपी तयार असतात. आयोगाकडून समुपदेशन केल्यावर बरीच जोडपी समजूतदारपणो भांडण मिटविण्यास तयार होतात. पण कुटुंबातील इतर सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे वाद विकोपाला जातात आणि घटस्फोटासाठी प्रकरण कोर्टात दाखल होते, असे महिला आयोगाच्या
अध्यक्षा अॅड. विद्या तानावडे यांनी सांगितले.