खासदारनिधी २५ कोटी रुपयांपर्यत वाढवा लोकसभेत एकमुखी मागणी : सरकारकडून आश्वासन नाही

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:47+5:302015-08-08T00:23:47+5:30

नवी दिल्ली : खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी(एमपीएलएडी) वार्षिक पाच कोटींवरून २५ कोटी रुपये करण्याची मागणी अनेक खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत केली मात्र सरकारने कोणतीही

Increase in MP fund to Rs. 25 crores Unlike demand in the Lok Sabha: There is no assurance from the government | खासदारनिधी २५ कोटी रुपयांपर्यत वाढवा लोकसभेत एकमुखी मागणी : सरकारकडून आश्वासन नाही

खासदारनिधी २५ कोटी रुपयांपर्यत वाढवा लोकसभेत एकमुखी मागणी : सरकारकडून आश्वासन नाही

ी दिल्ली : खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी(एमपीएलएडी) वार्षिक पाच कोटींवरून २५ कोटी रुपये करण्याची मागणी अनेक खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत केली मात्र सरकारने कोणतीही
घोषणा करण्याचे टाळले.
संपूर्ण मतदारसंघाच्या विकासात्मक मागण्या पाहता पाच कोटींचा निधी पूर्णपणे अपुरा ठरतो, असे
भाजपचे उदयप्रताप सिंग यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना म्हटले. त्यांनी ही रक्कम १५ कोटी रुपये करण्याची मागणी केली असता अन्य सदस्यांनी २५ कोटींचा घोषा लावत जोरदार समर्थन दिले. त्यावर सभागृहाची तशी इच्छा असेल तर माझे समर्थनच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पीठासीन अध्यक्ष एम. थम्बीदुराई यांनी ही मागणी फेटाळली. खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आधीच ही मागणी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्याकडे केली आहे, असे सांगतानाच त्यांनी संसदीय कार्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांना सभागृहाची एकमुखी मागणी सरकारला कळवावी, असे सुचविले. (वृत्तसंस्था)
----------------------------
रेल्वेमंत्र्यांकडून समर्थन
रुडी यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदारांच्या निधीत वाढ करण्याला अनुकूलता दर्शविली असून तसे पत्र समितीकडे पाठविले होते, याचे स्मरण थम्बीदुराई यांनी करवून दिले. सरकारने याआधीच सभागृहाच्या भावनेची दखल घेतली असून पुन्हा सरकारला भावना कळविली जाईल, असे रुडी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Increase in MP fund to Rs. 25 crores Unlike demand in the Lok Sabha: There is no assurance from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.