ऊसरोपे लावल्यास उत्पन्नात वाढ: काळे
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:32+5:302015-07-10T23:13:32+5:30

ऊसरोपे लावल्यास उत्पन्नात वाढ: काळे
>बारामती । दि. १० (प्रतिनिधी) :उसाच्या अधिक उत्पन्नासाठी शेतकर्यांनी वेगवेगळे प्रयोग करायला हवेत. ऊसलागवडीपूर्वी ऊसरोपे तयार केली, तर उत्पन्नात अधिक वाढ होऊ शकते, असे माळेगाव कारखान्याचे ऊसविकास अधिकारी सुरेश काळे यांनी सांगितले.कारखान्याच्या वतीने ऊसलागवड हंगामाच्या पूर्वी कांबळेश्वर (ता. बारामती) येथे आयोजित ऊसपीक परिसंवाद येथे ते मार्गदर्शन करीत होते. काळे म्हणाले, की ऊस उत्पन्नवाढीसाठी हिरवळीची खते घेतल्यास त्यांनाही रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे; त्यामुळे शेतकर्यांनी उसाच्या लागवडीची घाई करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. उसाची सरी एक फुटापेक्षा जास्त खोल नसावी. कारण, बेणे खोल रोवल्यास ते लवकर उगवत नाही. बांधणी करताना मुळ्या तुटणार नाहीत, याची दक्षता घेण्यास त्यांनी संागितले.या वेळी माळेगाव साखर कारखान्याचे संचालक सुरेश खलाटे, माजी संचालक जयवंत जगताप, युवराज खलाटे, श्रीधर घोरपडे, महादेव खलाटे, वसंत खलाटे, नामदेव खलाटे आदी उपस्थित होते. ०००