त्या प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30
लातुर: लातुर शहरातील बसवेश्वर चौकात भर दिवसा एका युवकावर हल्ला केल्याप्रकरणी पोलीसांनी चौघा आरोपींना अटक केली होती़या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती़सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले़न्यायालयाने चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ केली आहे़

त्या प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ
ल तुर: लातुर शहरातील बसवेश्वर चौकात भर दिवसा एका युवकावर हल्ला केल्याप्रकरणी पोलीसांनी चौघा आरोपींना अटक केली होती़या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती़सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले़न्यायालयाने चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ केली आहे़बसवेश्वर चौकात मुस्कान चायनिज सेंटरमध्ये राहूल ज्योतीराम गंभीरे (रा़सिंकदरपुर ता़लातुर) हा युवक चार साथीदारासोबत ५ जुनरोजी बसला असता जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होतेदरम्यान उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे़या प्रकरणी ग्रामीण पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़या प्रकरणी सोनु उर्फ प्रतिक दगडू केदार (वय १९ राग़ुमास्ता कॉलनी)राहूल आत्माराम राठोड ़(वय १९ रा़मोतीनगर लातूर), पंकज शाम पारीख (वय १९ रा आदर्श कॉलनी), अक्षय सुनिल चांडोले (वय १९ रा बोधे नगर) या चौघाजणांना लातूर ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़सोमवारी पोलीस कोठडीचा कालावधी संपला असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करताच न्यायालयाने या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत १७ जुनपर्यंत वाढ केली आहे़