नवी दिल्ली : दारू पिऊन वाहन चालविणा-यांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचे ठरविले असून, यापुढे मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास, त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. वाहनाचे रजिस्ट्रेशन करताना थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्याचा विचार आहे.सध्याच्या दारू पिऊन गाडी चालविणा-या चालकामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाविरोधात कलम ३0४ (अ) अन्वये गुन्हा दाखल होतो आणि दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा तुरुंगवास व दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही शिक्षा वाढवण्यात येणार आहे.समितीने वाहतूक कायद्यात बदल सुचवताना, प्रत्येक वाहतूक पोलीस व परिवहन अधिका-याकडे बॉडी कॅमेरा असावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-याचे कृत्य कॅमे-यात टिपता येईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे समितीने म्हटले आहे.
मद्यपी वाहनचालकांच्या शिक्षेत वाढ, थर्ड पार्टी विमा अनिवार्य ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:07 IST