लोखंडी साहित्याची परस्पर लावली विल्हेवाट अहमदपुरातील घटना : ट्रकचालकास अटक
By Admin | Updated: March 19, 2015 00:17 IST2015-03-18T23:04:26+5:302015-03-19T00:17:12+5:30
अहमदपूर : ट्रकमधील लोखंडी अँगल नागपुरला न नेता अन्यत्र नेहून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील एका ट्रकचालकाविरुद्ध अहमदपूर पोलिसठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे़

लोखंडी साहित्याची परस्पर लावली विल्हेवाट अहमदपुरातील घटना : ट्रकचालकास अटक
अहमदपूर : ट्रकमधील लोखंडी अँगल नागपुरला न नेता अन्यत्र नेहून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील एका ट्रकचालकाविरुद्ध अहमदपूर पोलिसठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे़
तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील सुभाष केंद्रे यांच्या मालकीचा एमएच १२ इएफ ९१३० हा ट्रक आहे़ या ट्रकवर गावातीलच बालाजी चाटे हा चालक म्हणून काम करीत आहे़ या ट्रकद्वारे साहित्याची ने-आण केली जाते़ या ट्रकमध्ये १६ टन वजनाचे लोखंडी अँगल भरण्यात आले होते आणि ते नागपुरला पोहोच करायचे होते़ ट्रकचालक बालाजी चाटे याने गावात नागपूरकडे जात असल्याचे सांगितले़ परंतु तो नागपूरकडे गेलाच नाही़ अन्य ठिकाणी जाऊन १० लाख ५० हजार रुपयाच्या मालाची मालकाच्या परस्पर विल्हेवाट लावली़ या प्रकरणी सुभाष केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक बालाजी चाटे याच्या विरुद्ध अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे़ या प्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक प्रकाश चिमणदरे हे करीत आहेत़