२५६ चाट, पानविक्रते निघाले कराेडपती; प्राप्तीकर खात्याने केला भंडाफाेड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 08:33 AM2021-07-24T08:33:44+5:302021-07-24T08:35:19+5:30

रस्त्याच्या कडेला ठेले लावून पाणीपुरी, भेळ किंवा पानविक्रेते अशी किती कमाई करत असतील, याचा अनेक जण विचार करत असतील.

income tax department did the disclosure 256 leaf seller and others income | २५६ चाट, पानविक्रते निघाले कराेडपती; प्राप्तीकर खात्याने केला भंडाफाेड

२५६ चाट, पानविक्रते निघाले कराेडपती; प्राप्तीकर खात्याने केला भंडाफाेड

Next

कानपूर : रस्त्याच्या कडेला ठेले लावून पाणीपुरी, भेळ किंवा पानविक्रेते अशी किती कमाई करत असतील, याचा अनेक जण विचार करत असतील. रस्त्यावर पदार्थांची विक्री करतात म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे विक्रेते लाखाे आणि काेट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. त्यांच्याकडे माेठ्या मालमत्ता आहेत. एवढी कमाई करताना ते एक रुपयाचाही कर भरत नाही. त्यांचा भांडाफाेड प्राप्तीकर विभागाने केला आहे.

ही माहिती प्राप्तीकर आणि जीएसटी खात्यांनी केलेल्या तपासणीतून उघड झाली आहे. कानपूर शहरात असे २५०हून अधिक किरकाेळ विक्रेते काेट्यधीश असल्याचे आढळले आहे. या यादीत लहान किराणा दुकानदार, औषधविक्रेते, भंगार विक्रेते, पान टपरीवाले किंवा चाट आणि पाणीपुरीचा ठेला लावून व्यवसाय करणारे काेट्यधीश असल्याचे उघड झाले आहे. हे किरकाेळ विक्रेते ना प्राप्तीकर भरतात किंवा त्यांचा जीएसटीशी काही संबंध असताे. मात्र, अशा काेट्यधीशांवर प्राप्तीकर खात्याची नजर हाेती. त्यानुसार तपासणी केल्यानंतर अधिकारी चक्रावून गेले. प्राप्तीकर विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करुन या छुप्या कराेडपतींना हुडकून काढले. अत्यंत साधे राहणीमान असल्यामुळे हे लाेक कराेडपती असल्याचे लक्षात येत नाही. मात्र, मालमत्तांसाेबत ‘पॅन’ आणि आधार क्रमांक जाेडल्यामुळे त्यांची पाेलखाेल झाली. या विक्रेत्यांनी एक रुपयाचाही प्राप्तीकर किंवा जीएसटी भरलेला नाही.
 

Web Title: income tax department did the disclosure 256 leaf seller and others income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.