अॅपच्या माध्यमातून भरता येणार इन्कम टॅक्स
By Admin | Updated: February 15, 2017 17:02 IST2017-02-15T12:43:33+5:302017-02-15T17:02:38+5:30
येत्या काळात काही वेळातच तुम्ही कायम खाते क्रमांक (पॅन) प्राप्त करू शकता.

अॅपच्या माध्यमातून भरता येणार इन्कम टॅक्स
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - येत्या काही दिवसांत मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे कायम खाते क्रमांक (पॅन) प्राप्त करू शकणार आहात. इतकेच नव्हे तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून प्राप्तिकरही भरू शकता. करदात्यांचं आयुष्य सोपं करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी) ई-केवायसीच्या माध्यमातून रिअल टाइम बेसिसवर तात्काळ पॅन उपलब्ध होण्यासाठी काम करत आहे.
ई-केवायसीशी संबंधित व्यक्तीचा पत्ता आणि वैयक्तिक माहितीची खातरजमा करता येते. एका अधिका-यानं सांगितलं की, ई-केवायसीद्वारे एक सिम कार्ड दिल्यास तशा प्रकारे पॅनही जारी केलं जाऊ शकतं. त्यामुळे पॅन मिळण्याचा कालावधी दोन ते तीन आठवड्यांवरून 5 ते 6 मिनिटांपर्यंत येऊ शकतो. या प्रक्रियेच्या माध्यमातून नंबर तात्काळ मिळणार असून, कार्ड नंतर घरपोच मिळणार आहे.
सीबीडीटी आणि कंपन्यांशी संबंधित असलेल्या मंत्रालयानं नव्या कंपन्यांना एका फॉर्मच्या माध्यमातून चार तासांत पॅन जारी करण्यासाठी करार केला आहे. पॅन तात्काळ मिळावं, असा त्या पाठीमागे उद्देश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपन्यांची व्यावसायिकरीत्या ओळखीची संख्याही समजणार आहे. कर विभागानं एक अॅप डेव्हलप केल्यानं कर भरण्यासाठी त्याची मदत होणार आहे. या अॅपमध्ये पॅनसाठी अर्ज केल्यास रिटर्नच्या ताज्या माहितीसह देवाण-घेवाणीसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. कर विभाग स्वतःच्या पोर्टलच्या माध्यमातून ब-याच सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या अॅपमुळे वरिष्ठ नागरिकांसोबतच तरुण करदात्यांसाठी आयुष्य सोपं होणार आहे. डायरेक्टरेट ऑफ सिस्टीम सीबीडीटीच्या दोन प्रोजेक्टवर काम सुरू आहे.