शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:50 IST

भिकाऱ्यांसंबंधित अभियान आणि सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक भिकाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे.

लखनौमध्ये अनेक भिकाऱ्यांकडे स्मार्टफोन आणि पॅनकार्ड सापडले आहेत. भिकाऱ्यांसंबंधित अभियान आणि सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक भिकाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे. सर्वेक्षणादरम्यान लखौमध्ये ५३१२ भिकारी आढळून आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये भिकाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यासंदर्भात समाज कल्याण विभाग आणि DUDA (जिल्हा नागरी विकास संस्था) यांनी एक सर्वेक्षण केलं. ज्यामध्ये ५३१२ भिकारी आढळले ज्यांची कमाई कष्टकरी लोकांपेक्षा जास्त आहे. लहान मुलांना कडेवर घेऊन भीक मागणाऱ्या महिलांची रोजची कमाई प्रत्येकी ३,००० रुपयांपर्यंत आहे. वृद्ध आणि लहान मुले ९०० रुपयांपासून ते २ हजार रुपये कमावत आहेत.

सौरभ त्रिपाठी यांनी सांगितलं की, ते अनेक दिवसांपासून परिसराचं सर्वेक्षण करत आहेत. काही लोक मुद्दाम भीक मागत आहेत. ९० टक्के भिकारी आहेत, जे हरदोई, बाराबंकी, सीतापूर, उन्नाव, रायबरेली इत्यादी जिल्ह्यांमधून आले आहेत. या भिकाऱ्यांचं उत्पन्न समजल्यावर अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. त्यांनी सांगितलं की, बाराबंकीच्या लखपेडाबाग येथे राहणारा भिकारी अमन याच्याकडे स्मार्टफोनपासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही आहे. त्याच पॅनकार्डही आहे. 

सर्वेक्षणानुसार, लखनौचे लोक दररोज सरासरी ६३ लाख रुपये भिकाऱ्यांना देतात. लखनौ महानगरपालिका, समाजकल्याण विभाग आणि DUDA यांच्या सर्वेक्षणात राजधानी लखनौमध्ये एकूण ५३१२ भिकारी आढळले आहेत. या भिकाऱ्यांच्या उत्पन्नाबाबत सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, ते दररोज सरासरी ३,००० रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. ही कमाई करण्यात स्त्रिया पुढे आहेत. 

टॅग्स :BeggarभिकारीMONEYपैसा