एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. "ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात जीवितहानी झाल्यानं मन हेलावलं आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला. तर, चंद्रकांत पाटील यांनीही घटनेच्या सखोल चौकशीही मागणी केली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही चौकशी होणारच, असं स्पष्टीकरण दिलंय. तसेच, या घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.
Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 17:27 IST
मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना जाहीर केली ५ लाखांची मदत
Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश.मृतांच्या वारसांना जाहीर केली ५ लाखांची मदत