शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या जिन्यात आग गेंट्याल टॉकीज येथील घटना : पाण्याचा मारा केल्याने अनर्थ टळला

By admin | Published: July 12, 2015 11:56 PM

सोलापूर : अशोक चौक येथील गेंट्याल टॉकीज जवळील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागील जिन्यात कागदी पुठ्ठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ५ हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार दुपारी १.१0 वा. घडला. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

सोलापूर : अशोक चौक येथील गेंट्याल टॉकीज जवळील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागील जिन्यात कागदी पुठ्ठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ५ हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार दुपारी १.१0 वा. घडला. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागील जिन्यात टीव्ही, रेफ्रिजरेटर आदी इलेक्ट्रिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी इलेक्ट्रिकचा मीटर बोर्ड असून शॉर्टसर्किटमुळे पडलेल्या ठिणगीने कागदी पुठ्ठ्याला आग लागली. आगीमुळे धुराचे लोळ ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या दुसर्‍या मजल्यावरील गोडावूनमधून बाहेर पडू लागल्याने इमारतीवरील टॉवरला आग लागण्याची अफवा परिसरात पसरली. ओम इलेक्ट्रिकलचे राजेश रामचंद्र महिंद्रकर यांनी तत्काळ अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटना स्थळावर येऊन गोडावूनला पाण्याचा मारा सुरू केला. मात्र आग ही जिन्यात लागल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर जिन्यात पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. (प्रतिनिधी)
कोट....
दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या पाठीमागे व गोडावूनच्या मोकळ्या जागेत कागद व टाकाऊ वस्तू ठेवू नये. कोणत्याही कारणास्तव अशा वस्तू पेट घेऊ शकतात याचा मोठा धोका निर्माण होतो. ओम इलेक्ट्रॉनिक्सची आग वेळेत जर आटोक्यात आली नसती तर वर असलेल्या ऑईल पेंटच्या दुकानाला धोका झाला असता. व्यापार्‍यांनी असा धोका होणार नाही याची काळजी घ्यावी.
केदार आवटी, अधीक्षक, अग्निशामक दल.