कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या थोडगा येथील घटना : १ लाखाचे कर्ज

By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:04+5:302015-03-08T00:31:04+5:30

अहमदपूर : दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाचा वाढता बोजा यास कंटाळून शुक्रवारी सायंकाळी एका शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील थोडगा येथे घडली आहे़

Incidents of farmer suicides in tigress bogus debt: 1 lac loan | कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या थोडगा येथील घटना : १ लाखाचे कर्ज

कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या थोडगा येथील घटना : १ लाखाचे कर्ज

मदपूर : दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाचा वाढता बोजा यास कंटाळून शुक्रवारी सायंकाळी एका शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील थोडगा येथे घडली आहे़
परमेश्वर विश्वनाथ तरडे (वय ३७, रा़ थोडगा) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे़ परमेश्वर तरडे यांना पाच एकर शेती आहे़ या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे़ यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातून काही उत्पन्न निघाले नाही़ त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे अशी भ्रांत निर्माण झाली होती़ त्यातच बँक ऑफ महाराष्ट्राचे १ लाख रूपयांचे कर्ज होते़ या कर्जाची परतफेड कशी करायची, अशी चिंता त्यांना लागून असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले़ त्यामुळे ते वैफल्यग्रस्त बनले होते़
या चिंतेतून परमेश्वर तरडे यांनी शुक्रवारी सायंकाळी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले़ त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़ त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे़

Web Title: Incidents of farmer suicides in tigress bogus debt: 1 lac loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.