े उद्घाटनापूर्वी पुलावरून धावली वाहने
By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:14+5:302015-06-29T00:38:14+5:30
उड्डाणपुलावरून धावली वाहने

े उद्घाटनापूर्वी पुलावरून धावली वाहने
उ ्डाणपुलावरून धावली वाहनेऔरंगाबाद : मोंढा नाका उड्डाणपुलावरून आज सायंकाळी वाहने धावली. काही वेळासाठी तो पूल ट्रायलसाठी (चाचणी) खुला करण्यात आला होता. पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहने काही वेळेसाठी जाऊ दिली. त्या वाहनांमध्ये जड व हलक्या वाहनांचा समावेश होता. पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात त्या पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता उदय भर्डे यांनी सांगितले की, पुलाच्या चाचणीसाठी तो रविवारी काही वेळासाठी खुला करण्यात आला होता. पुलावर दोन्ही बाजूंनी डांबरीकरणाचा सरफेस लेअर (थर) टाकणे बाकी आहे. त्याचे काम सोमवारपासून सुरू होणार आहे. ते काम येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न राहील.