शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गोव्यात इफ्फीचे सोमवारी उद्घाटन, देशविदेशातील १९५ चित्रपटांची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 19:07 IST

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा उद्या सोमवारी उघडणार आहे. दोनापॉल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सायंकाळी होणा-या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्घाटन होईल.

 पणजी - ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा उद्या सोमवारी उघडणार आहे. दोनापॉल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सायंकाळी होणा-या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्घाटन होईल. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांची खास उपस्थिती असेल. उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता  इराणमधील निर्माता मजिद मजिदी याचा ‘बियाँड दि क्लाऊड्स’ हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. दहा दिवसांच्या काळात एूकण ८२ देशांचे १९५ चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत.

 

आंतरराष्टÑीय विभाग व इंडियन पॅनोरमा या इफ्फीतील विभागांमध्ये यावर्षी गाजलेले आणि अफलातून चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार असून त्यात ६८ भारतीय चित्रपटांचे ‘प्रीमियर’ असतील. ‘बियाँड दि क्लाऊड्स’ ला लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. इफ्फीचे यावर्षीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दाखविण्यात येणाºया एकूण चित्रपटांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. जागतिक चित्रपटांच्या विभागात आॅस्करसाठी पाठविलेल्या २८ चित्रपटांचा समावेश असेल. एकूण १0 जागतिक प्रिमियर, १0 आशियाई चित्रपट प्रिमियर होतील काही हिंदी चित्रपटांचेही प्रिमियर होणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात यंदा नऊ चित्रपट दाखवले जातील.आॅस्करसाठी भारतातून नामांकन मिळविलेला ‘न्युटन’ हा सिनेमाही प्रदर्शित केला जाणार आहे. 

कॅनडियन सिने दिग्दर्शक अ‍ॅटॉम इगोनॉय यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. १५ चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले असून अनेक टीव्ही मालिका त्यांच्या नाववर आहेत. ‘नेक्स्ट आॅफ कीन’ या त्यांच्या चित्रपटास मानहेम, हिदेलबर्ग येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृ ष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. 

यंदाच्या इफ्फीत बॉलिवूड सुपरस्टर अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी आॅफ द इयर’ पुरस्कार  यांना दिला जाणार आहे. बच्चन यांची चित्रपट कारकीर्द जवळपास अर्धशतकाची असून, त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अमिताभ स्वत: तसेच संपूर्ण बच्चन कुटुंबिय समारोपाच्या सोहळ्यास खास उपस्थिती लावणार आहे. 

सिने जगताशी संबंधित देश, विदेशीतील सुमारे ७ हजार प्रतिनिधींनी इफ्फीसाठी नोंदणी केली आहे. सिने कलाकार, तंत्रज्ञ यांची मोठी उपस्थिती यंदाच्या इफ्फीला लाभणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017Indiaभारत