वेतनासाठी चतुुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण

By Admin | Updated: May 21, 2014 00:02 IST2014-05-21T00:02:17+5:302014-05-21T00:02:17+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील मैल कामगार व चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत असून, या कर्मचार्‍यांचे वेतन व प्रवास भत्ते तत्काळ अदा करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

Inadequate hunger strike for 4th class employees for salary | वेतनासाठी चतुुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण

वेतनासाठी चतुुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण

शिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील मैल कामगार व चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत असून, या कर्मचार्‍यांचे वेतन व प्रवास भत्ते तत्काळ अदा करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
मैल कामगार, मिस्त्री व वाहनचालक यांना गेल्या काही महिन्यांपासून वेतन मिळत नाही, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्या तोंडी आदेशानुसार तालुक्याच्या ठिकाणी सहायक लेखाधिकार्‍यांकडून प्रवास भत्ते अदा करण्याबाबत अन्याय केला जात आहे. कालेलकर करारानुसार १२ ते २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नतीचे वेतन मंजूर करणेकामी जात प्रमाणपत्राची आवश्यकता नसताना नरेंद्र महाजन यांच्याकडून प्रस्तावावर स्वाक्षरी होत नसून जात प्रमाणपत्राची मागणी करून गरीब मैल कामगारांवर अन्याय होत आहे. कालेलकर करारानुसार मैल कामगारांना मागील थकबाकीसह सानुग्रह अनुदान रोखीने अदा करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघाचे यासीन सय्यद यांच्यासह भगवान गांगुर्डे, बाळू गायकर, रमेश गडाख, पांडू शिंदे, शशिकांत गडाख, भीमा पटाईत, दादा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
फोटो कॅप्शन-
२०पीएचएमअे-६१- थकीत वेतन व प्रवास भत्ते त्वरित मिळावेत, या मागणीसाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

Web Title: Inadequate hunger strike for 4th class employees for salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.