प्राध्यापकांची पूर्ण थकबाकी देण्यास केंद्राची असमर्थता
By Admin | Updated: July 28, 2014 02:34 IST2014-07-28T02:34:22+5:302014-07-28T02:34:22+5:30
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची रक्कम महाराष्ट्र सरकारने रोखून धरली आहे

प्राध्यापकांची पूर्ण थकबाकी देण्यास केंद्राची असमर्थता
नवी दिल्ली : विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची रक्कम महाराष्ट्र सरकारने रोखून धरली आहे. त्यात सुधारित पगार आणि थकीत रकमेचा समावेश असून महाराष्ट्र सरकारने ८० टक्के म्हणजे १८,३७,७६,६३,१०९ एवढी रक्कम मागितली असता केंद्राने ती देण्यास असमर्थता दर्शविली आहे. याबाबतची कबुली मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.
महाराष्ट्र सरकारने प्राध्यापकांचे १ जानेवारी ०६ ते मार्च २०१० या काळातील वेतनाची थकित रक्कम देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. केंद्राचा वाटा १४,७०,२१,३०,४८७ एवढा असून महाराष्ट्र सरकारने प्राध्यापकांना ११,५०,१६,००,००० एवढी रक्कम वितरित केल्याचे पाहता केंद्राला ९,२०,१२,८०,००० एवढी रक्कम देणे आहे. याआधीच थकित तेवढीच रक्कम देण्याची केंद्राने परवानगी दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)