शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या कंपन्यांमध्ये वाढले लैंगिक शोषण? २०२३ मध्ये ३१ % वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 13:20 IST

वित्त वर्ष २०२३ मध्ये लैंगिक शोषणाच्या घटनांत ३१ टक्के वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : नोकरदार महिलांच्या लैंगिक शोषणात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून ५० टक्क्यांपेक्षाही अधिक महिला लैंगिक शोषणापासून वाचण्यात अपयशी ठरतात, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. ‘कम्प्लायकारो डॉट काॅम’ने जारी केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या ५०० कंपन्यांपैकी ३७० कंपन्यांत २०२२ च्या तुलनेत वित्त वर्ष २०२३ मध्ये लैंगिक शोषणाच्या घटनांत ३१ टक्के वाढ झाली आहे.

आतापर्यंत ७० लाख तक्रारीnमहिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात २०२२ पर्यंत नोकरीच्या स्थळी लैंगिक शोषण झाल्याच्या ७० लाख तक्रारी प्राप्त झाल्या. nसर्वाधिक तक्रारी दिल्ली (११.२ लाख), पंजाब (१०.५ लाख) आणि गुजरात (१०.४ लाख) या राज्यांतून आल्या. nदिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या शहरांत सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या.

जगात ३८ टक्के महिलांचे शोषणजगभरात ३८ टक्के महिलांचे कामाच्या स्थळी लैंगिक शोषण होते. १४१ देशांत त्याविरुद्ध कायदे आहेत. मात्र, ५८ टक्के महिला तक्रार करण्याचे धाडस करीत नाहीत.

कधी ना कधी झाले शोषणबहुतांश महिलांनी सांगितले की, त्यांना कधी ना कधी लैंगिक शोषणास सामोरे जावे लागले. ५१% महिलांनी लज्जेस्तव तक्रार टाळली.

काय म्हणतो कायदा?कार्यस्थळावरील लैंगिक शोषणाविरोधात देशात ‘लैंगिक शोषण (प्रतिबंध, निषेध व निवारण) अधिनियम-२०१३’ हा कायदा करण्यात आला. त्यानुसार, महिलेच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करणे, भीती अथवा प्रलोभन दाखवून शारीरिक संबंधांची मागणी करणे, अश्लील बोलणे व अश्लील चित्र अथवा व्हिडीओ दाखविणे गुन्हा आहे.

५००कंपन्यांपैकी ३७० कंपन्यांत लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत वाढ६५%कंपन्यांपैकी ३७० कंपन्यांत लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत वाढ५१%महिला तक्रार करण्याची हिंमत करीत नाहीत 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीjobनोकरी