शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मुलानं मुलीला पळवून नेलं अन् गावकऱ्यांनी आईची काढली नग्न धिंड, कर्नाटकातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 12:55 IST

मुलाने मुलीला पळवून नेलं म्हणून ग्रामस्थांनी तरूणाच्या आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केली.

नवी दिल्ली : लाजिरवाणी आणि संतापजनक घटना कर्नाटकातील बेलगी जिल्ह्यातील छोट्याश्या गावात घडली. मुलानं मुलीला पळवून नेलं म्हणून ग्रामस्थांनी तरूणाच्या आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केली. संतप्त गावकरी इथेच थांबले नसून त्यांनी त्या माऊलीची नग्न अवस्थेत धिंड देखील काढली. जमावानं महिलेच्या घराची तोडफोड केली आणि तिला नाहक त्रास दिला. कर्नाटकातील वंटामुरी गावात घडलेल्या या भयावह घटनेनंतर गावातील काही कुटुंबीयांनी स्थलांतराचा पर्याय निवडला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून पीडित महिलेची सुटका केली. 

खरं तर पोलीस गावात आले तेव्हा पीडित महिलेला वीजेच्या खांबाला बांधून ठेवले होते. पोलिसांनी तिला जवळच्या इस्पितळात दाखल करून अधिक तपास सुरू केला. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सिद्धरामप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून गेलेल्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले होते. पण, २४ वर्षीय अशोक आणि १८ वर्षीय प्रियंका यांचे प्रेमसंबंध होते. लग्न ठरले असताना प्रियंका अशोकसोबत पळून गेल्याने स्थानिकांनी अशोकच्या आईवर राग काढला. 

अमानवीय घटना घडताच अनेकांनी सोडलं गावदरम्यान, स्थानिक पोलीस पळून गेलेल्या अशोक आणि प्रियंका यांचा शोध घेत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावात अशी अमानवीय घटना घडल्यानंतर अनेक जण वंटामुरी सोडून निघून गेले. तरूणीच्या कुटुंबीयांनी घातलेला हा गोंधळ रात्रभर सुरू होता. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा मुलीकडील काही मंडळी पुन्हा एकदा हल्ला करण्याच्या इराद्याने आली होती. पण, खाकी वर्दी पाहताच त्यांनी पळ काढला. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी