शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'मंत्र्यांसोबत यमुना नदीत...'; योगी आदित्यनाथांचं अरविंद केजरीवालांना मोठं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:56 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंत्र्यांसोबत यमुना नदीत स्नान करण्याचे आव्हान दिले आहे. 

Delhi Election 2025 Yogi Adityanath: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थेट आव्हान दिले. एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी यमुना नदीत प्रदूषणावरून केजरीवालांना लक्ष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

योगी आदित्यनाथ म्हणाले, "काल (२२ जानेवारी) मी माझ्या सर्व ५५ मंत्र्‍यांसह प्रयागराजमधील संगमावर एकत्र स्नान केले आणि पुण्य मिळवले. आम्ही नशिबवान आहोत की, महाकुंभामध्ये देश-विदेशातून येत असलेल्या भाविकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली."

'नैतिक धाडस असेल, तर केजरीवालांनी उत्तर द्यायला हवं'

"मुख्यमंत्री म्हणून मी आणि माझे मंत्री प्रयागराजमधील संगमावर स्नान करू शकतो, तर मी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना विचारू इच्छितो की, तुम्ही तुमच्या मंत्र्यांसह यमुना नदीत स्नान करू शकता का? जर त्यांच्यात नैतिक धाडस असेल, तर त्यांनी याचं उत्तर द्यायला हवं", असं केजरीवाल यावेळी म्हणाले. 

एनडीएमसी क्षेत्र सोडले तर उर्वरित दिल्लीत रस्ते, गटारं आणि पाण्याच्या पाण्याची काय स्थिती आहे. आजपासून एका दशकापूर्वी लोक दिल्लीत सुविधा मिळवण्यासाठी आणि दिल्ली बघण्यासाठी यायचे. आता रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ते हेही कळत नाही", अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी आप सरकारवर केली. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाKumbh Melaकुंभ मेळा