शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अटकेपासून संरक्षण देऊनही कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 08:28 IST

न्यायालयाने व्यक्त केली गंभीर चिंता, आता सुप्रीम कोर्ट उद्या, ७ जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलेल्या व्यक्तीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघण्याच्या व त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या लातूरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.सन २०२०मध्ये एमआयडीसी लातूर पोलीस ठाण्यात शिवराम पंडित यांच्या विरुद्ध फसवणूक आणि बनावट दस्तऐवजाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमिनीच्या वादाशी संबंधित हे प्रकरण आहे. पंडित यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

७ मे २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली व ६ आठवड्यात बाजू मांडण्याचे आदेश सरकारला दिले. दरम्यान, पंडितला अटक करु नये, असेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन पंडीत यांना अटक न करता चार्ज शिट दाखल केले. ४ जुलै, २०२२ रोजी पंडित यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करुन त्यांना २४ जून २०२२ रोजी अटक करण्यात आली आणि ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची सुटका करावी, अशी विनंती करण्यात आली.

न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि कृष्णा मुरारी यांच्या सुट्टीतील खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, ७ मे २०२१च्या विशिष्ट अंतरिम आदेशानंतरही अभियोग पक्षाने पंडित यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट मिळवले आणि जेव्हा ते न्यायालयात हजर झाले तेव्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक २, लातूर यांनी २४ जून २०२२च्या आदेशाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. ७ मे २०२१ रोजीचे सर्वोच्च न्यायालयाचे अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण सहा आठवड्यांनंतर संपुष्टात आल्याचे निरीक्षण मॅजिस्ट्रेट कोर्टाने न्यायालयीन कोठडी देताना केले. सुप्रीम कोर्टाने पंडित यांना त्याच दिवशी सोडावे आणि त्याच दिवशी याचा अनुपालन अहवाल  न चुकतासादर करण्याचे आदेश दिले. आता सुप्रीम कोर्ट उद्या, ७ जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे कारण पाहता अभियोग पक्षाचा प्रामाणिकपणा आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेले आकलन हे गंभीर चिंतेचे विषय बनतात.- दिनेश माहेश्वरी आणि कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय