शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 06:43 IST

प्रज्वलविरोधात लवकरच ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ बजावणार 

लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : कथित लैंगिक शोषण व अपहरण प्रकरणात आरोपी असलेले जेडीएस आमदार व माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी (दि. ४) ताब्यात घेतले, असे कर्नाटक पोलिसांनी सांगितले. 

न्यायालयाने रेवण्णा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर विशेष तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचा मुलगा खासदार प्रज्वल यालाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्याच्याविरोधात सीबीआय लवकरच ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी करण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी कथित लैंगिक शोषण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी प्रज्वलला अटक करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. तसेच सध्या विदेशात पलायन केलेल्या प्रज्वलच्या प्रत्यार्पणासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.

कधी बजावतात ‘ब्लू कॉर्नर नोटीस’?आंतरराष्ट्रीय पोलिस संस्थेद्वारे (इंटरपोल) एखाद्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्तीची ओळख, स्थान किंवा हालचालीबद्दल सदस्य देशांकडून अतिरिक्त माहिती संकलित करण्यास ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली जाते. 

राहुल गांधींचे पत्रकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना पत्र लिहून या प्रकरणातील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे. गांधी यांनी पत्रात म्हटले की, मी आपल्याला पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती करतो. ते (पीडित) आपल्या सहानुभूती आणि पाठिंब्यासाठी पात्र आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाKarnatakकर्नाटक