शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बंडाळीला उत, काँग्रेसने पतीला उमेदवारी दिल्याने आमदार पत्नी नाराज, म्हणाल्या, पक्षाने...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 23:28 IST

Rajasthan Assembly Election: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीला उत आला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीला उत आला आहे. काँग्रेसने रामगड विधानसभा मतदारसंघामध्ये सफिया खान यांच्या जागी पती जुबेर खान यांना तिकीट दिले आहे. मात्र आपल्याऐवजी पतीला तिकीट दिल्याने आमदार असलेल्या सफिया खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्षाने हे योग्य केले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे. भाजपाने आतापर्यंत १२४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र ही यादी जाहीर होताच भाजपामध्येही विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. अलवरमधील थानागाजी विधानसभा मतदारसंघातून हेमसिंह भडाना यांना उमेदवारी दिली आहे. याच्या विरोधामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आपल्याच उमेदवाराचा पुतळा पेटवला.

 तर काँग्रेसने अलवरमधील रामगड विधानसभा मतदारसंघातून सफिया खान यांचं तिकिट कापत त्यांचे पती जुबेर खान यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आपलं तिकीट कापलं गेल्याने सफिया खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

सफिया खान प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, पक्षानं हे चांगलं केलेलं नाही.  मात्र या प्रकरणी आतापर्यंत जुबेर खान यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जुबेर खान हे प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. रामगड सीट ही मेवात क्षेत्रामध्ये येते. भाजपाकडून येथे ज्ञानदेव आहुजा यांनी दीर्घकाळापर्यंत विजय मिळवत होते. मात्र २०१८ मध्ये आहुजा यांचं तिकिट कापून भाजपाने सुखवंत सिंह यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या सफिया खान यांनी बाजी मारली. आता भाजपा रामगड येथून कुणाला उमेदवारी देते हे पाहावे लागेल.  

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थान