शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पतीची क्रूरता! लग्न झाल्यापासून पत्नीला खोलीत डांबलं, शौचासाठी केला बॉक्सचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 12:53 IST

पतीने पत्नीला कैद करून ठेवल्याचे उघड होताच एकच खळबळ माजली.

कर्नाटकातील म्हैसूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पतीने पत्नीला कैद करून ठेवल्याचे उघड होताच एकच खळबळ माजली. पती पत्नीवर अत्याचार करायचा असा आरोप आहे. खरं तर पतीने पीडितेला टॉयलेटमध्येही जाऊ दिले नाही. पतीने तिच्या खोलीत शौचाला जाण्यासाठी एक छोटा बॉक्स ठेवला होता. पण, असे असताना देखील संबंधित महिलेला अजूनही तिच्या पतीसोबत राहायचे आहे. पीडितेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. सध्या पोलिसांनी या महिलेची कैदेतून सुटका केली आहे. महिलेचे वय ३० असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित पत्नीला तिच्या पतीने लग्न झाल्यापासून घरात डांबून ठेवल्याचे सांगितले जात आहे. महिलेने दावा केला आहे की, तिचा पती घराला कुलूप लावून कामावर जायचा. पीडितेला दोन मुले आहेत. शाळेतून आल्यानंतर मुले घराबाहेर वडील येण्याची वाट पाहत असायची. पती घरी परतल्यावरच मुलांना घरात प्रवेश मिळत होता. याबाबत परिसरातील कोणीही पतीशी भाष्य देखील करत नव्हते. सुमा आणि सनैया यांचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. 

शौचासाठी केला बॉक्सचा वापरपीडित महिलेने सांगितले की, ती आपल्या मुलांना खिडकीतूनच जेवण द्यायची आणि शौचासाठी एका छोट्या बॉक्सचा वापर करायची. कारण या खोलीबाहेर जाण्यावर बंधने होती. ही महिला त्या पुरुषाची तिसरी पत्नी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला कैदेतून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी महिलेची विचारपूस केली. 

तसेच महिलेला तिच्या पतीवर कोणतीही कारवाई करायची नाही किंवा तिने त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला नाही. सध्या ती तिच्या माहेरच्या घरी असून तिच्या वैवाहिक जीवनातील समस्यांवर कुटुंबातील सदस्य एकत्र बसून तोडगा काढणार असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस