शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीने आई आणि बहिणीचा नंबर ब्लॉक केला तरच सोबत राहणार; पत्नीची अनोखी अट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 14:40 IST

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका केंद्रात समुपदेशन केल्यानंतर पती-पत्नी एकत्र राहण्यास तयार झाले आहेत. समुपदेशनामध्ये संबंधित महिलेने म्हटले की, पतीची बहीण आणि आई आमच्या घरात भांडणाचे कारण आहे. म्हणून पत्नीने पतीला त्याची आई आणि बहिणीचा मोबाईल नंबर ब्लॉक करण्यास सांगितले. यावर पतीने दोघांचे नंबर ब्लॉक केले. यानंतर महिलेने पतीसोबत राहण्यास होकार दिला. पतीने आई आणि बहिणीचे नंबर ब्लॉक केल्यावर पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास होकार दिला. खरं तर पती चार महिने बहिणीच्या घरीही जाणार नाही असे ठरवण्यात आले आहे. समुपदेशन केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. यानंतर महिला पतीसोबत निघून गेली. खरं तर माझोला येथील करुला येथे राहणाऱ्या एका महिलेने एसएसपी कार्यालयात अर्ज दिला होता. ज्यात तिने सांगितले की, आठ वर्षांपूर्वी तिचे लग्न फर्ममध्ये काम करणाऱ्या तरुणाशी झाले होते. पती-पत्नी मुलांसह भाड्याच्या घरात राहतात. मात्र, पती त्याची बहीण आणि आईच्या सांगण्यावरून तिला मारहाण करायचा. 

पतीने आई आणि बहिणीचा नंबर केला ब्लॉकजेव्हा मी घरखर्चासाठी पैसे मागते तेव्हा पती घर सोडून बहिणीच्या घरी जातो असे पत्नीने सांगितले. पतीने वागणूक न बदलल्यास घटस्फोट द्यावा, अशी मागणीही महिलेने केली होती. महिलेचे प्रार्थनापत्र संबंधित केंद्रात पाठवण्यात आले. येथे दोन्ही पक्षांमध्ये समुपदेशन करण्यात आले, ज्यात महिलेने सांगितले की, "आमच्या घरात भांडणाचे कारण पतीची बहीण आणि आई आहे. जर पती त्यांच्या संपर्कात राहिला तर मी त्याच्याबरोबर राहणार नाही." यावर आई व बहिणीशी संपर्क करणार नसल्याचे पतीने कबुल केले. यानंतर पतीने दोघांचेही नंबर ब्लॉक केले. यानंतर महिलेने पतीसोबत राहण्यास होकार दिला. केंद्राच्या प्रभारी संदीपा चौधरी यांनी सांगितले की, समुपदेशनानंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. पती-पत्नीने एकत्र राहण्याचे मान्य केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार