शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन", पत्नीचा कॉन्स्टेबलवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:04 IST

Shivpuri constable Rape Case: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे पत्नीने कॉन्स्टेबल पतीवर गंभीर आरोप केले आहेत. 

नवी दिल्ली : आयटीबीपीच्या एका जवानाने आपल्या पत्नीचे दिल्लीतील श्रद्धाप्रमाणे तुकडे करण्याची धमकी दिली, त्यानंतर पत्नीने जिल्हा दंडाधिकार्‍यांसमोर आपली व्यथा मांडली. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील आहे, जिथे एका तरुणीने तिच्या पतीवर बलात्कार आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांच्या भीतीने त्याने लग्न केले आणि नंतर तिला सोडून दिले. यावर विरोध केल्यावर त्याने श्रद्धासारखे 35 तुकडे करण्याची धमकी दिली असे पत्नीने आरोपात म्हटले. 

सोशल मीडियावरून झाली होती मैत्रीITBP जवान पतीने पीडितेला धमकी दिल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली. तरुणीने सांगितले की, तिची आणि संबंधित जवानाची सोशल मीडियावर मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर जवानाने प्रशिक्षणानंतर लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे पीडित महिला त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास तयार झाली.

गरोदर राहताच केले गर्भपात पीडितेने सांगितले की, ती गरोदर राहिल्यानंतर पतीने तिचा गर्भपात केला. लग्नासाठी दबाव टाकल्यावर जवानाच्या नातेवाईकांनी 20 लाख रुपयांची मागणी केली होती. याशिवाय तिचे वडील लग्नाबाबत बोलण्यासाठी तरुणाच्या घरी गेले असता तेथून त्यांना हाकलून दिले आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पीडित महिलेने सांगितले.

जवानाच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप संबंधित पीडित महिलेने जवान पतीच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीचे म्हणणे आहे की, कॉन्स्टेबल रमेशच्या मेहुण्यानेही दिल्लीच्या श्रद्धाप्रमाणे तिचे तुकडे करण्याची धमकी दिली होती, याशिवाय कॉन्स्टेबलच्या काकांनीही जीवे मारण्याची धमकी दिली होती. तक्रारीनंतर शिवपुरीचे जिल्हाधिकारी अक्षय कुमार यांनी आयटीबीपीमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलशी फोनवर चर्चा केली. यावेळी पीडितेच्या पतीने ती माझी पत्नी असल्याचे सांगितले. माझे तिच्याशी लग्न देखील झाले आहे मात्र तिची कोणीतरी दिशाभूल केली असल्याचे कॉन्स्टेबलने सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरsexual harassmentलैंगिक छळ