शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हुंड्याच्या लालसेपोटी पती बनला राक्षस; हातपाय बांधून ठेवले अनैसर्गिक शारीरिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 09:56 IST

मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ग्वालियर : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर ग्वालियर जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या पतीवर हातपाय बांधून अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि हुंडा म्हणून गाडी आणली नाही म्हणून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर पतीने 2 वर्षाच्या मुलीसह पत्नीलाही घराबाहेर हाकलून दिले आहे.

ही घटना ग्वालियरमधील महाराजपुरा येथील राधाकृष्ण कॉलनीमधील आहे. घरातून हाकलून दिल्यानंतर महिलेने आपले नाते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, पती आणि सासरच्या मंडळींवर कोणताही परिणाम होत नसल्याने तिने पोलिसांत धाव घेतली. या घटनेबाबत महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. 

पीडितेने केली पोलिसांत तक्रार शहरातील जुनी छावणी येथील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय विवाहित महिलेने तक्रारीत म्हटले की, महाराजपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राधाकृष्ण कॉलनी येथे राहणाऱ्या तरुणाशी 2019 मध्ये तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर ती सासरी गेली असता काही महिने सर्व काही सुरळीत चालले आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला तिच्या माहेरून महागडी गाडी आणायला सांगायला सुरुवात केली. त्यावर तिने आई एकटी असून शिवणकामातून खर्च चालवत असल्याचे सांगून हुंडा आणण्यास नकार दिला. यानंतर पतीने तिचा छळ सुरू केला. दरम्यान, तिने एका मुलीला जन्म दिला, परंतु त्यानंतरही तिच्या पतीच्या कृतीत कोणताही बदल झाला नाही.

पती बनला राक्षसपीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीने तिला अमानवी वागणूक दिली आणि हुंड्याची मागणी करत तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले. हे करताना तो तिचे हातपाय बांधायचा. त्यामुळे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता. तरीही आपले नाते टिकवण्यासाठी ती सर्वकाही सहन करत होती. 

विरोध केल्याने घरातून काढलं बाहेरतसेच पतीच्या अमानवी कृत्याला विरोध करून या कृत्याची माहिती सासरच्या मंडळींना दिली असता सासरच्यांनी पीडितेला घराबाहेर काढले. घरातून हाकलून दिल्यानंतर महिलेने नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही जमले नाही मग तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशgwalior-pcग्वालियरPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळdowryहुंडा