शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

अंगावर काटा आणणारे दृश्य! उभ्या असलेल्या वाहनांना चिरडत नेले; बस चालकालाही विश्वास बसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:44 IST

bengaluru bus accident : बस अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Bus Accident Video : दिवसेंदिवस अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लांबच लांब वाहनांच्या रांगा आणि त्यात बसने दिलेली धडक... अंगावर काटा आणणारे दृश्य सर्वांचे लक्ष वेधत आहे. बंगळुरू येथे एक मोठा अपघात होता होता वाचला. तेथील स्थानिक हेब्बल उड्डाणपुलावर मंगळवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान बसने अनेक दुचाकीस्वारांना आणि त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या काही चारचाकी वाहनांना धडक दिली. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहता बस चालकाने जाममध्ये अडकलेल्या वाहनांना जाणीवपूर्वक धडक दिल्याचे दिसत नाही. चालकही गोंधळलेल्या अवस्थेत दिसतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बसचा वेग खूपच कमी असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर बस चालकाला नक्की चूक कुठे झाली हे समजत नसल्याचे दिसते. इतर वाहनांना धडकल्यानंतर बस जेव्हा थांबते तेव्हा चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती चालकाशी संवाद साधताना दिसतो. घाबरलेल्या अवस्थेतील चालकाचे हावभाव सर्वकाही सांगत आहेत. 

सर्वप्रथम बसचा वेग खूप कमी असतो. पण, तितक्यात बससमोर असलेली दुचाकी ट्रॅफिक असल्यामुळे थांबते. मग बस चालकाचे नियंत्रण सुटते आणि बस जवळपास पाच ते सहा वाहनांना जाऊन धडकते. सुदैवाने एक चारचाकी वाहन वाटेत आडवे आल्याने बसला ब्रेक लागतो. दरम्यान, ही घटना बीएमटीसीच्या व्होल्वो बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बसमध्ये बसवण्यात आलेल्या दोन कॅमेऱ्यांनी दोन वेगवेगळी दृश्ये रेकॉर्ड केली. पहिल्या कॅमेऱ्यात बसमध्ये बसलेले प्रवासी दिसत आहेत, तर दुसऱ्या क्लिपमध्ये ड्रायव्हर ट्रक चालवताना दिसत आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरSocial Viralसोशल व्हायरलAccidentअपघात