शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने २ घुसखोरांना केले ठार; दहशतवाद्यांकडून २१०० पाकिस्तानी रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 16:20 IST

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश आले असून दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश आले असून दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले असल्याची माहिती कुपवाडा पोलिसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे माचल सेक्टरच्या कुमकडी भागात लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत घुसखोरी केलेल्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. ऑपरेशन अद्याप सुरू आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत २ AKS बंदुका, ४ AKMags, ९० राउंड, १ पाकिस्तानी पिस्तूल, १ पाउच आणि २१०० पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी लष्कर आणि पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. अलीकडेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले होते की, राज्यातील तरुण पिढीला लक्ष्य करून दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान आणि त्यांच्या एजन्सी मागील दोन वर्षांपासून अंमली पदार्थाचा वापर करत आहेत. पण, दहशतवाद रोखण्यात पोलीस दलाला यश मिळत आहे. लवकरच उर्वरित दहशतवाद्यांचा देखील शोध लागेल अशी आम्हाला आशा आहे.

"जम्मू-काश्मीरच्या लोकांना शांतता हवी आहे"तसेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले की, सीमेवर असलेल्या पाकिस्तान समर्थित देशविरोधी घटकांच्या नापाक मनसुब्यांना हाणून पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून यावर लष्कराचे लक्ष आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना शांतता हवी आहे आणि त्यांनी पाकिस्तानचा दहशतवादाचा चेहरा ओळखला आहे, जो तरुणांना आपल्या लोकांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही सिंग यांनी सांगितले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीDeathमृत्यूPakistanपाकिस्तान