शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक-इन्स्टावर मैत्री, मग बनवला अश्लील video; ब्लॅकमेलच्या धमकीने उकळले लाखो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 12:30 IST

मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आदी इंटरनेट माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर मैत्री करून अश्लील व्हिडीओ बनवून महिलेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सनी चौहान उर्फ ​​राघव चौहान असे आरोपीचे नाव आहे. तो इंदूर येथील रहिवासी आहे.

आरोपी सोशल मीडियावर मुलींशी मैत्री करून त्यांच्याशी जवळीक साधायचा. मग त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवायचा आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करायचा. आरोपीने जिल्ह्यातील एका महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून 1.25 लाख रुपये उकळले. आणखी 70 हजार रुपयांची मागणी केल्यावर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

रेल्वेत करतो नोकरी डीसीपी सेंट्रल डिस्ट्रिक्ट श्वेता चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी चौहान रेल्वेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन आणि घटनेत वापरलेले तीन सिमकार्ड जप्त केले आहेत. 12 जानेवारी रोजी सायबर सेल पोलीस स्टेशनला एका महिलेकडून सायबर क्राईम ऑनलाइन पोर्टलद्वारे तक्रार प्राप्त झाली होती.

इस्टाग्रामवरून झाली ओळख तक्रारीत पीडितेने सांगितले होते की, ती तिच्या पतीसोबत करोलबाग येथे राहते. मागील वर्षी जुलैमध्ये पीडितेची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनी चौहान नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री झाली. ते आपापसात बोलू लागले. अनेक महिने बोलून तिचा विश्वास जिंकल्यानंतर सनीने महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​तिच्याकडून 1.25 लाख रुपये उकळले. खरं तर जेव्हा पीडितेने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपीने तिच्या पतीला व्हिडीओ पाठवला आणि पतीकडेही पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. सायबर सेल पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक खेमेंद्र पाल सिंह यांच्या पथकाने करोलबाग येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस