शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हिमाचलमध्ये निकालांआधीच मुख्यमंत्रिपदावरून वाद, दावेदारी ठोकत प्रतिभा सिंह म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:19 IST

Himachal Pradesh Assembly Elections 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असून, काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची चाहूल लागली आहे. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

सिमला - हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. राज्यात यावेळी सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असून, काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची चाहूल लागली आहे. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्षरीत्या दावेदारी ठोकली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस नेते सुखविंदर सिंह  सुक्खू आणि प्रतिभा सिंह आमनेसामने येताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष  प्रतिभा सिंह प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. जनतेने वीरभद्र सिंह यांचा चेहरा आणि कामांच्या आधारावर मतदान केले आहेत. काँग्रेसने जी कामं केली आहेत त्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. जनता वीरभद्र सिंह यांच्या कामांच्या उपकारांची परतफेड करू इच्छित आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिभा सिंह म्हणाल्या की, वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र आमदारांचं मत आणि हायकमांड मुख्यमंत्रिपदावर कोण बसेल याचा निर्णय घेईल. काँग्रेसमध्ये कुठलाही गटतट नाही आहे. अनेकजण मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. आम्ही एकत्र बसून सर्वसहमतीने मुख्यमंत्रपदाचा चेहरा निश्चित करू, असे त्यांनी सांगितले. 

हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची झुंज सुरू आहे. यामध्ये ६८ जागांपैकी ६४ जागांचे कल समोर आले असून, सुरुवातीच्या एका तासाच्या कलांनंतर भाजपा ३० आणि काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे. तर इतरांनी ५ जागांवर आघाडी घेतली आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसPoliticsराजकारण