शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

धक्कादायक! पत्नीचं रूसणं पडलं महागात; पतीने तिला व्हिडीओ कॉल करून उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 19:09 IST

मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ग्वालियर : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गिरवाई परिसरात एका तरुणाची पत्नी भांडणाचा राग मनात धरून माहेरी गेली. मग संतप्त पत्नीला शांत करण्यासाठी पतीने व्हिडीओ कॉल केला. खूप विनवण्या करूनही पत्नीने माहेरून सासरच्या घरी येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने व्हिडीओ कॉलवरच तिला फाशी घेईन अशी धमकी दिली. तरीही पत्नीने न ऐकल्याने पतीने गळ्यात फास बांधला. हे पाहून घाबरलेल्या पत्नीने व्हिडीओ कॉल कट केला आणि घटनेची माहिती सासू आणि सासऱ्यांना दिली. सासू-सासऱ्यांनी फासावर लटकलेल्या मुलाला वाचवले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

पतीसोबतच्या भांडणामुळे पत्नी गेली माहेरी ग्वालियरच्या गिरवाई पोलीस ठाण्याच्या बिरथरिया परिसरात राहणारे जगमोहन कुशवाह एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांचे लग्न ग्वालियरमधील ललितपूर कॉलनीत राहणाऱ्या कवितासोबत झाले होते. आठवडाभरापूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला असता कविता घर सोडून ललितपूर कॉलनीतील आपल्या माहेरच्या घरी गेली. आपली पत्नी रूसून माहेरी गेल्याने संतप्त झालेल्या जगमोहनने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. जगमोहनने कविताला घरी येण्यासाठी अनेक वेळा फोन केले, परंतु कविताने सासरच्या घरी परतण्यास साफ नकार दिला. त्यामुळे पती जगमोहन सतत मानसिक तणावाखाली होता.

व्हिडीओ कॉलवर उचललं टोकाचं पाऊल सोमवारी पहाटे देखील जगमोहन यांनी कविताचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी पत्नी कविताला व्हिडीओ कॉल केला. यादरम्यान त्यांनी पुन्हा कविताला घरी परत येण्याची विनंती केली. मात्र, कविताने घरी येण्यास नकार दिला. संवादादरम्यान जगमोहन यांनी कविताला ती आली नाही तर फाशी घेईन, अशी धमकी दिली. कविताने ती धमकी गांभीर्याने घेतली नाही आणि ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. यानंतर संतापलेल्या जगमोहन यांनी त्यांच्या गळ्यात फास घातला. अशा परिस्थितीत पतीला पाहून कविताने तात्काळ व्हिडीओ कॉल कट केला आणि त्यानंतर सासू आणि सासऱ्यांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली. जगमोहनचे आई-वडील वरच्या मजल्यावर पोहोचले आणि त्यांनी पाहिले की तो आधीच फासावर लटकलेला होता. कुटुंबीयांनी तात्काळ दोर कापून मुलाला रुग्णालयात नेले. जगमोहन यांचे प्राण वाचले मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे त्यांना जैरोग्य रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमधून न्यूरो वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारी