शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२ बहिणी एकमेकांच्या प्रेमात, लग्नही झाले! समलिंगी विवाहावर कुटुंबीयांचा आक्षेप; प्रकरण पोलिसांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:10 IST

दोन्ही बहिणींनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता दिली नसली तरी देशाच्या विविध भागातून त्यासंबंधीच्या बातम्या समोर येत असतात. बिहारमधील सिवान येथून देखील एक अशीच घटना उघडकीस आली. इथे दोन बहिणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. दोन्ही मुलींनी एकमेकांना पती-पत्नी म्हणून लग्न देखील केले. ही बाब कुटुंबीयांना समजताच एकच खळबळ माजली. घरच्यांनी दोघींनाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण दोघीही आपल्या नात्यावर ठाम राहिल्या. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. 

दरम्यान, दोन्ही मावस बहिणींनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी स्वत:च्या सुरक्षेची मागणी करणारा लेखी अर्ज राजधानी पाटणाच्या वरिष्ठ पोलिसांना  दिला. अर्जात संबंधित बहिणींनी सांगितले की, खुर्शीद अहमद यांची मुलगी रोशनी खातून (२१) आणि तरवार पोलीस स्टेशन परिसरातील मंजूर आलम यांची मुलगी तराना खातून (१८) अशी आमची ओळख आहे. आम्ही मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत आहोत आणि ३१ ऑक्टोबर रोजी लग्न केले असून पती-पत्नी म्हणून एकमेकांना स्वीकारले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दिला हवाला पोलीस तक्रारीत मुलींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत समलैंगिक संबंधात राहणे गुन्हा नसल्याचे म्हटले. अशा जोडप्यांना समाजात राहण्याची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याचे या बहिणींनी नमूद केले.  दोघीही बहिणी घरातून पळून पाटण्यात आल्या आणि तिथे एकत्र राहू लागल्या, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या नात्याबद्दल घरी समजल्यानंतर घरच्यांनी आक्षेप घेतला पण दोघीही समलिंगी विवाहावर ठाम होत्या. मुलींनी सांगितले की दोघी एकाच धर्माच्या आहेत आणि मग कुणाला काय हरकत आहे? दोघींनीही कुटुंबीयांवर समलिंगी विवाहाविरोधी असल्याचा आरोप केला आहे.  

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नPoliceपोलिस