शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या वेळी भेटणं प्रेमी युगुलाला भोवलं; गावकऱ्यांनी आक्षेर्पाह स्थितीत पकडलं अन् लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 15:43 IST

रात्रीच्या वेळी प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर गावकऱ्यांना सापडला अन् एकच खळबळ माजली.

रात्रीच्या वेळी प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर गावकऱ्यांना सापडला अन् एकच खळबळ माजली. हे प्रेमीयुगुल संबंधित तरूणीच्या घरात गावकऱ्यांना रंगेहाथ सापडले. दोघांना पाहताच बघ्यांनी आरडाओरडा केल्याने गावकरी गोळा झाले. प्रेमी युगुल सापडल्यानंतर गावकऱ्यांनी दोघांचे लग्न लावले. बिहारमधील जमुई जिल्ह्यातील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. येथील धरमपूर गावातील सुमित कुमार आणि महापूर गावातील रहिवासी सिमरन कुमारी यांच्यात प्रेमसंबंध होते. 

प्रियकर सुमित प्रेयसी सिमरनला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी गेला होता. कुटुंबीयांनी सांगितले की, सुमित कुमार रात्री अंधाराचा फायदा घेऊन घरात घुसला आणि त्याला सिमरनसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. याची चाहूल लागताच आम्ही दरवाजा उघडला असता, पकडले जाण्याच्या भीतीने सिमरनने सुमितला घरात ठेवलेल्या बॉक्समध्ये बंद करून ठेवले.  गावकऱ्यांनी लावलं लग्न संशय आल्यानंतर गावकरी गोळा झाले. मग त्यांनी शोध घेतला असता सुमित बॉक्समध्ये लपला असल्याचे उघड झाले. या प्रकरणी प्रियकर सुमितने सांगितले की, मागील दीड वर्षांपासून आमच्यात प्रेमसंबंध सुरू आहेत. इंस्टाग्रामवरून आमची ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि या चर्चेनंतर या प्रकरणाचे रुपांतर प्रेमप्रकरणात झाले. सुमित सिमरनला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी तिच्या घरी अनेकदा गेला होता. यावेळी देखील असेच झाले सिमरनने फोन करताच रात्री १०.३० वाजता सुमित तिच्या घरी गेला होता. पण, गावकऱ्यांना संशय आला अन् दोघे सापडले.

दरम्यान, हे प्रेमी युगुल सापडताच गावकऱ्यांनी लग्न लावले. यानंतर दुसऱ्या दिवशी स्थानिक खैरा पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही प्रेमी युगुलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. मात्र, पोलिसांनाही ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न