शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गॅस कटरच्या साहाय्याने ATM कापले; CCTV कॅमेरे तोडले, चोरीची रक्कम पाहून पोलिसही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 14:58 IST

बिहारमधील छपरा येथून एक चोरीची अजब घटना समोर आली आहे.

Chhapra ATM Robbery News | नवी दिल्ली : बिहारमधील छपरा येथून एका चोरीची अजब घटना समोर आली आहे. इथे चोरट्यांनी सेंट्रल बँकेच्या एटीएमला लक्ष्य करत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून सुमारे 8 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला. ही घटना छपराच्या मुफसिल पोलीस स्टेशन परिसरातील आहे. खरं तर चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी एटीएम मशीन चोरी करण्यापूर्वी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि हार्ड डिस्कही पळवून नेला.

दरम्यान, चोरट्यांनी रात्रभर गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन कापले, पण पोलिसांना यांची माहिती देखील मिळाली नाही. सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास करण्यास सुरूवात केली. एटीएमचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. याआधीही मुफसिलच्या मेथवालियामध्ये एका खासगी बँकेचे एटीएम चोरण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी चोरटे एटीएम कापू शकले नाही. लक्षणीय बाब म्हणजे सेंट्रल बँकेने 8 लाख 75 हजारांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. चोरट्यांनी केले मोठे नुकसान बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक विकास कुमार यांनी सांगितले की, 8,75,000 ची रोकड चोरीला गेली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि हार्ड डिस्कचे देखील मोठे नुकसान केले आहे. मुफसिल पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्याची माहिती समोर येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :BiharबिहारtheftचोरीatmएटीएमPoliceपोलिस