शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्स्टेबलने महिला पोलिसाला केली मारहाण; पोलीस स्टेशनचे प्रमुख म्हणाले, "चुकून झालं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:16 IST

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इथे एका महिला कॉन्स्टेबलला पोलीस स्टेशनच्या ड्रायव्हर कॉन्स्टेबलने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, कॉन्स्टेबल महिला पोलिसाला सर्वांसमोर मारहाण करत आहे. यादरम्यान अनेक पोलिसही तिथे उभे असल्याचे दिसते आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत असे सांगण्यात येत आहे की, भोजपूर जिल्ह्यातील कोइलवार गावातील रहिवासी असलेल्या मो. मेराज जफर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी अर्जात आरोप केला आहे की, मो. शमीम अहमद हे त्यांच्या घरासमोर निर्धारित जागेपेक्षा जास्त जागेत घर बांधत आहेत. याप्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेले होते. 

हवालदाराने लोकांनाही केली मारहाणया प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोइलवार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पोलिसांच्या पथकाच्या चालकाने स्थानिकांना शिवीगाळ देखील केल्याचे बोलले जात आहे. शिवाय चालक हवालदाराने शिवीगाळ करून मारहाणही केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यावेळी उपस्थित लोकांनी घटनेचा व्हिडीओ बनवला असता, संतप्त हवालदाने मोबाईल हिसकावून घेतला आणि गोळी मारण्याची धमकी दिली. अशातच उपस्थित महिला पोलीस हलावदार ड्रायव्हरला थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे चालक हवालदाराने सर्वांसमोर महिला शिपायाच्या कानाखाली मारली.    पोलीस स्टेशनचे प्रमुख म्हणाले... याप्रकरणी कोइलवार पोलीस ठाण्याचे प्रमुख अविनाश कुमार यांनी सांगितले की, जमीन अतिक्रमण प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिला कॉन्स्टेबल चालकाला तिथून हटवत होती. हवालदाराला वाटले की स्थानिक लोकं आहेत आणि चुकून त्याने हात उचलला.  

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल