शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉजवर अन्य धर्माच्या पुरूषासोबत बुरखा घातलेली महिला; ६ आरोपींचं खोलीत जाऊन भयंकर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:19 IST

बुरखा घातलेली महिला दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये गेली होती.

बंगळुरू: कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बुरखा घातलेली महिला दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये गेली होती. याची माहिती मिळताच सहा जण जबरदस्तीने या हॉटेलच्या खोलीत शिरले आणि जोडप्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. आरोपींनी घटनेचा व्हिडीओ देखील केला आहे. हावेरी जिल्ह्यातील हनागल तालुक्यातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलच्या खोलीबाहेर सहा जण पोहोचल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. मग त्यांनी दार ठोठावले आणि दार उघडले. दरवाजा उघडताच सर्व आरोपी आत शिरले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात. महिलेने बुरखा उचलून तो घालण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने तिलाही मारहाण केली. 

आरोपींनी महिलेसोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीलाही मारहाण केली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोन-तीन हल्लेखोरांनी त्याला पकडले. यानंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर लॉजबाहेर चित्रित करण्यात आलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये ती महिला आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. परंतु हल्लेखोर तिचा बुरखा उचलून तिला व्हिडीओमध्ये दाखवण्याचा करतात. संबंधित जोडप्याने हणागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दोन आरोपींना अटक  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 जानेवारी रोजी हणागल येथील नल्हारा क्रॉस येथील हॉटेलमध्ये घडली. सहा आरोपींवर हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचे गुन्हे दाखल आहेत. सहापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्य चौघांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhotelहॉटेल