शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माकडासाठी युवक 'देवदूत', रिक्षातून गाठलं रूग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 14:30 IST

वीजेच्या धक्क्याने तडफडत असलेल्या माकडासाठी एक युवक देवदूत बनला.

वीजेच्या धक्क्याने तडफडत असलेल्या माकडासाठी एक युवक देवदूत बनला. बिहारमधील या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. येथील आरा परिसरात एका युवकाने वेदनेने व्याकूळ झालेल्या माकडाला उपचारासाठी रूग्णालयात नेले अन् त्याचा जीव वाचवला. वीजेचा धक्का लागल्यानंतर माकड कोसळले आणि जमिनीवर तडफडू लागले. तडफडत असलेल्या माकडाला पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली पण कोणीच त्याला स्पर्श करण्याचे धाडस केले नाही. मात्र एक युवक या गर्दीला अपवाद ठरला आणि त्याने मदतीसाठी धाव घेतली. चंदन नावाच्या या युवकाने रिक्षा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्याने जखमी माकडाला रिक्षातून रूग्णालयात दाखल केले. 

संबंधित तरूणाने आरा येथील एका खासगी रूग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार देत त्याला पशुसंवर्धन विभागात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर चंदनने माकडाला प्रथम दुसऱ्या खासगी दवाखान्यात नेले व तेथे प्राथमिक उपचार करून नंतर त्याला पशुसंवर्धन विभागाच्या रुग्णालयात नेले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उशीर झाला असता तर माकडाचा जीव गेला असता - डॉक्टर माकडावर उपचार करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी माकड पूर्णपणे जळाल्याचे सांगितले. त्याला श्वास घेताना त्रास होत होता. त्याला इथे आणायला अजून थोडा उशीर झाला असता तर कदाचित ते दगावलेही असते. त्याला वेळीच प्राथमिक उपचार करून येथे आणण्यात आल्याने जीव वाचला, असे डॉक्टरांनी सांगितले. चंदनने दाखवलेली तत्परता आणि त्याच्या मेहनतीला सर्वजण दाद देत आहेत. रूग्णालयातील डॉक्टरांनी देखील युवकाच्या धाडसाचे विशेष कौतुक केले.  

टॅग्स :BiharबिहारMonkeyमाकडInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी