शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना, रक्तबंबाळ स्थितीत सापडला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:07 IST

Kolkata Crime News: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोलकात्यामधील आनंदपूर परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेचा मृतदेह रक्तबंळाळ स्थितीत सापडला असून, ती कोण होती, कुठली होती, याबाबतची कुठलीही माहिती समोर येऊ शकलेली नाही. 

कोलकात्यामधील आनंदपूर परिसरामध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत सापडला. तसेच तिच्या शरीरावर जखमांच्या खुणाही दिसून आल्या. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. आता पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच महिलेची हत्या कशी झाली आणि का झाली? तसेच तिच्यावर बलात्कार झाला होता का, हे समोर येणार आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच या महिलेशी संबंधित माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

दरम्यान, कोलकाता बलाल्कार प्रकरणामुळे आधीच देशात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.  ९ ऑगस्ट रोजी कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. तिच्चा मृतदेहाच्या पोस्टमार्टेममधून या महिला डॉक्टरवर बलात्कार झाला होता, अशी माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. तसेच आता या प्रकरणाचा पुढील तपास हा सीबीआयकडून सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल