शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

 ५२ लाख रुपये मिळवण्याची हाव, पतीने मित्रांसोबत मिळून आखला भयानक कट, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:03 IST

Crime News: राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील नवलगड येथे विम्याची रक्कम मिळवण्यासाठी पतीने मित्रांसोबत मिळून पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पत्नीला मारून ५२ लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळवण्याचं स्वप्न पाहणारा पती आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील नवलगड येथे विम्याची रक्कम मिळवण्यासाठी पतीने मित्रांसोबत मिळून पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पत्नीला मारून ५२ लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळवण्याचं स्वप्न पाहणारा पती आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत डीएसपी राजवीरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १२ मे रोजी रात्री घडली होती. नवलगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारी गावाजवळ सहीराम सैनी या इसमाने पत्नी कृष्णा सैनी हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला. मात्र फॉरेन्सिक अहवाल आमि समोर आलेल्या पुराव्यांमुळे तो पुरता अडकला. त्यानंतर पोलिसांनी सहीरामसह त्याचे चार सहकारी असलेल्या सचिन, मुकेश, प्रदीप आणि अमृत यांच्यावर अटकेची कारवाई केली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपी सहीराम याने ११ मे रोजी त्याच्या पत्नीला नवलगड बस स्टँडवर सोडले. त्यानंतर त्याच दिवशी भगेरा गावातील एका कॅफेमध्ये जाऊन सचिन कुमावत याला ५० लाख रुपये रोख आणि १ रिकाम चेक दिला आणि पत्नीची हत्या करण्याची सुपारी दिली. त्यानंतर सचिन याने त्याच्या टोळीसोबत मिळून एक भयंकर कट आखला.

१२ मे रोजी रात्री ठरलेल्या योजनेनुसार सहीराम हा दुचाकीवर पत्नीला बसवून आला. तसेच त्याने बडवासा गावाजवळ जाणीवपूर्वक दुचाकी पाडली. त्यामुळे कृष्णा सैनी ही रस्त्यावर पडली. त्यानंतर मागून कारमधून आलेल्या सचिन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तिच्यावर दगडांनी हल्ला केला. त्यात कृष्णा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

त्यानंतर सहीराम याने त्वरित रुग्णवाहिकेला बोलावून अपघाताचं नाटक केलं. तसेच १३ मे रोजी स्वत:च पोलीस ठाण्यात जात पत्नीला भरधाव कारने टक्कम मारल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना तो रचून सांगत असलेल्या कहाणीवर संशय आला. पोलिसांनी घटनास्थळी केलेला तपास आणि शवविच्छेदन अहवालामुळे सहीराम याचं पितळ उघडं पडलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा सहीराम याने गुन्हा कबुल केला. तसेच ५२ लाख रुपयांच्या विम्यासाठी पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान