पनामावरून इम्रान खान यांच्या हाती नवे कोलीत

By Admin | Updated: April 25, 2016 03:49 IST2016-04-25T03:49:20+5:302016-04-25T03:49:20+5:30

पनामा पेपर्सवरून इम्रान खान यांच्या हातात आता नवे कोलीत मिळाले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून खाली खेचण्यासाठी तेहरिक ए इन्साफ पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे.

Imran Khan's new Koliath in Panama | पनामावरून इम्रान खान यांच्या हाती नवे कोलीत

पनामावरून इम्रान खान यांच्या हाती नवे कोलीत

इस्लामाबाद : पनामा पेपर्सवरून इम्रान खान यांच्या हातात आता नवे कोलीत मिळाले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून खाली खेचण्यासाठी तेहरिक ए इन्साफ पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे.
पनामा प्रकरणात शरीफ यांच्या कुटुंबातील नावे समोर आल्यानंतर इम्रान खान यांनी आता शरीफ यांच्याविरुद्ध मोहीमच उघडली आहे. इम्रान खान यांनी आरोप केला आहे की, शरीफ यांनी सरकार चालविण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. दरम्यान, या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते शफाकत महेमूद यांनी म्हटले आहे की, आम्ही नैतिक आधारावर शरीफ यांचा राजीनामा मागत आहोत.
पनामा पेपर प्रकरणात शरीफ यांची मुले हसन आणि हुसैन व मुलगी मरीयम यांची नावे पुढे आली आहेत. त्यानंतर शरीफ यांना आता विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, शरीफ यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण तयार आहोत.
या चौकशीदरम्यान आपण चुकीचे सिद्ध झाल्यास प्रसंगी राजीनामा देण्यास आपण तयार असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.
........

Web Title: Imran Khan's new Koliath in Panama