दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: April 19, 2016 03:58 IST2016-04-19T03:58:35+5:302016-04-19T03:58:35+5:30

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना पुढील काही दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल,

Improvement in Dilipkumar's disease | दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

लवकरच मिळणार डिस्चार्ज
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना पुढील काही दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील परकार यांनी दिली.
सोमवारी संध्याकाळी डॉ. परकार यांनी दिलीपकुमार यांच्या आरोग्याविषयी माहिती देताना असे सांगितले की, ते शुद्धीत आहेत. ते आता व्यवस्थित जेवणदेखील घेत आहेत. कृत्रिम श्वसन यंत्रणेवर त्यांना ठेवण्यात आल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळले. त्यांच्या काही चाचण्या केल्या असून त्यांची प्रकृती
सुधारत आहे. अशीच प्रकृतीत सुधारणा होत राहिली तर त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल. त्यांच्याविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचेही डॉ. परकार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Improvement in Dilipkumar's disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.