शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

अटल बिहारी वाजपेयींच्या तब्येतीत सुधारणा, एम्स रुग्णालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 7:46 PM

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याची माहिती एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्यांना येत्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.   

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याची माहिती एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्यांना येत्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.   11 जूनला अटल बिहारी वाजपेयी यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना नियमित तपासणी साठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीनंतर त्यांना मूत्रसंसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत संभ्रम निर्माण झाली होता. दरम्यान, अटल बिहारी वाजपेयींच्या तब्येतीविषयी  एम्स रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. यावेळी एम्स रुग्णालयाचे डॉक्टर म्हणाले की, गेल्या 48 तासांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांचे मूत्रपिंड व्यवस्थित काम करु लागले आहे. तसेच, त्यांचा रक्तदाब आणि हार्ट  रेटदेखील चांगला आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली होती भेट..अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवानी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीHealthआरोग्य