सुधारित पान १ - शिक्षणमंत्र्यांच्या नावाने शिक्षकाची आत्महत्या!
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
(सुधारित बातमीमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया पाठवली आहे़ )

सुधारित पान १ - शिक्षणमंत्र्यांच्या नावाने शिक्षकाची आत्महत्या!
(स ुधारित बातमीमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया पाठवली आहे़ )़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़फोटो12ल्लस्रँिीू 30 व 26शिक्षणमंत्र्यांच्या नावाने शिक्षकाची आत्महत्या!राज्यातील पहिला बळी : नियुक्तीचा आदेश रद्द झाल्याने नैराश्यातून कृत्य नांदेड : नियुक्तीचे आदेश रद्द झाल्याने बेरोजगार झालेल्या हताश अंशकालीन कला शिक्षकाने त्यासाठी थेट शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरत आत्महत्येचा मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली़ सय्यद रमिजोद्दीन (२४) असे या शिक्षकाचे नाव असून, त्यांच्या मागे आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे़ मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येस शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांना जबाबदार धरले़ या दोघांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या आवारातच नातेवाईकांनी मृतदेहासह दोन तास ठिय्या दिला़ त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. २०१२-१३ मध्ये सय्यद यांची अंशकालीन कला शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती़ पुढे अंशकालीन शिक्षक हे केंद्र शासनाच्या योजनेनुसार नेमण्यात आले होते़ त्यांचे नियुक्तीचे आदेश रद्द झाल्याने तणावातून गुरुवारी रात्री त्यांनी घरी गळफास घेवून आत्महत्या केली़ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह घरी आणून अंत्यसंस्काराची तयारीही सुरु करण्यात आली होती़ परंतु मृताच्या खिशात चिठ्ठी सापडल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी अंत्ययात्रा थेट इतवारा ठाण्यात आणली़ या चिठ्ठीच्या आधारे नातेवाईकांनी शिक्षणमंत्री व शिक्षण सचिवांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली़ यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़दोन वर्षांपूर्वी सदर शिक्षकाला नोकरीवरुन कमी करण्यात आले होते. पदनिर्मिती न करता ही भरती झालेली होती. प्रकरण उच्च न्यायालयात गेलेले आहे. तेथे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे त्यात सरकार काहीही करु शकत नव्हते. मात्र अशी आत्महत्या करणे वाईट आहे, दु:खद आहे. न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा म्हणून सरकार प्रयत्नशील आहे.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़सदर शिक्षण पालिकेच्या शाळेत पार्टटाईम म्हणून कामास होता. या नियुक्त्या राईट टू एज्यूकेशन अंतर्गत केल्या गेल्या होत्या. त्या नियमाप्रमाणे भरल्या गेल्या नाहीत म्हणून रद्दही झाल्या होत्या. सरकारने नव्याने पोस्ट तयार केल्या आहेत़मात्र आम्हालाच घ्या म्हणून काही जण न्यायालयात गेले आहेत़ नगरपालिकेच्या शिक्षकांचा तसा सरकारच्या शालेय शिक्षण विभागाशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे याची माहिती मला देता येणार नाही.- अश्विनी भिडे, सचिव, शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य