सुधारित - कर्नाटक पोलिसांना नोटीस
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
(सबहेडमध्ये सुधारणा केली आहे.)

सुधारित - कर्नाटक पोलिसांना नोटीस
(स बहेडमध्ये सुधारणा केली आहे.)-------------------------------केंद्रीय मानवाधिकार आयोगाचीकर्नाटक पोलिसांना नोटीसयेळ्ळूर मारहाण प्रकरण : उत्तरासाठी चार आठवड्यांची मुदतबेळगाव : येळ्ळूर गावच्या वेशीवरचा महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर मराठी भाषिकांना केलेल्या अमानुष मारहाणप्रकरणी केंद्रीय मानवाधिकार आयोगाने कर्नाटक पोलिसांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.येळ्ळूर गावच्या वेशीवरील महाराष्ट्र राज्य नावाचा फलक २६ मे रोजी हटविल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूर येथील मराठी भाषिकांना बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच महाराष्ट्राचे विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह येळ्ळूर येथील मारहाण झालेल्या ५३ नागरिकांनी दिल्ली येथील मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. सहा महिन्यांनंतर याची दखल घेण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जयराम, तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रगुप्त, पोलीस निरीक्षक एम. बरमनी आणि कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव यांनाही ही नोटीस पाठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)------------चौकशीसाठी समिती येणारया प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी केंद्रीय आयोगाची समिती लवकरच कर्नाटकमधील येळ्ळूरमधील गावाचा दौरा करणार आहे. याचबरोबर ५३ नागरिकांना व विनोद तावडे यांना नोटिशीद्वारे चौकशीसंबंधी येत असल्याचे कळविण्यात आले आहे.