सुधारित बातमी --- तृणमूलचे मंत्री मदन मित्रा यांना अटक शारदा चिटफंड घोटाळा प्रकरण
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
कोलकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) शुक्रवारी प. बंगालचे परिवहन व क्रीडा मंत्री मदन मित्रा यांना अटक केली. सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे नेते असलेल्या मित्रा यांची साल्टलेक परिसरातील कार्यालयात साडेपाच तास कसून चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची अटक ही तृणमूलच्या चिंतेची बाब असली तरी ही अटक राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे या पक्षाचे म्हणणे आहे.
सुधारित बातमी --- तृणमूलचे मंत्री मदन मित्रा यांना अटक शारदा चिटफंड घोटाळा प्रकरण
कोलकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) शुक्रवारी प. बंगालचे परिवहन व क्रीडा मंत्री मदन मित्रा यांना अटक केली. सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे नेते असलेल्या मित्रा यांची साल्टलेक परिसरातील कार्यालयात साडेपाच तास कसून चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची अटक ही तृणमूलच्या चिंतेची बाब असली तरी ही अटक राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे या पक्षाचे म्हणणे आहे.मित्रा यांना शारदा रियॅलिटीशी निगडित एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर षडयंत्र रचणे, पैशाची अनियमितता व बेकायदेशीर आर्थिक लाभ घेण्याचे आरोप लावण्यात आले आहेत असे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. या अटकेबाबत प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी भाजपा बदल्याचे राजकारण करीत असल्याचे मत व्यक्त केले आहे. एका कॅबिनेट मंत्र्याला अटक करण्याआधी राज्य सरकार व विधानसभेच्या अध्यक्षांना अंधारात कसे ठेवले जाऊ शकते असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सीबीआयने सुदीप्त सेन व शारदा समूहाचे कायदेविषयक सल्लागार नरेश बलोडिया यांना अटक केली. याआधी कुणाल घोष व श्रृंजय बोस यांनाही याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.