सुधारित बातमी--- शारदा प्रकरणी मुकुल राय यांची चौकशी सत्य समोर आले पाहिजे- राय
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:50+5:302015-01-30T21:11:50+5:30
कोलकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल राय यांची सीबीआयने शुक्रवारी चौकशी केली. यात राय यांनी सत्य समोर आले पाहिजे असे प्रतिपादन केले असून तपास यंत्रणेसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

सुधारित बातमी--- शारदा प्रकरणी मुकुल राय यांची चौकशी सत्य समोर आले पाहिजे- राय
क लकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल राय यांची सीबीआयने शुक्रवारी चौकशी केली. यात राय यांनी सत्य समोर आले पाहिजे असे प्रतिपादन केले असून तपास यंत्रणेसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.सीबीआय कार्यालयात सुमारे पाच तास चाललेल्या या चौकशीनंतर राय यांनी, सत्य समोर यावे असे मत व्यक्त केले. तसेच सीबीआय मला चौकशीसाठी केव्हाही बोलावू शकते मी त्यांना सहकार्य करीन, हा तपास योग्य पद्धतीने व्हावा अशीही इच्छा त्यांनी पुढे व्यक्त केली. राय यांना १२ जानेवारी रोजी सीबीआयने पाचारण केले होते. मात्र त्यांनी त्यावेळी १५ दिवसांचा अवधी मागितला होता. त्यांनी यावेळी दीर्घकाळापासून बंगालमधील नागरिकांनी आपल्यावर केलेल्या प्रेमाकरिता त्यांचे आभार मानले. ज्या गरीब लोकांनी आपल्या आयुष्याची सगळी संपत्ती या कंपनीत गुंतवली त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे ते पुढे म्हणाले.