सुधारित बातमी-- झारखंड व जम्मू काश्मिरात आज मतदानाचा शेवटचा टप्पा
By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:02+5:302014-12-19T22:57:02+5:30
रांची/श्रीनगर-झारखंड व जम्मू काश्मीर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकरिता पाचवा व शेवटचा टप्पा २० डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. संथाल परगणातील १६ जागांकरिता कडेकोट बंदोबस्तात मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, विधानसभा अध्यक्ष शशांक शेखर भोक्ता व अनेक मंत्र्यांसह २०८ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे. यात १६ स्त्रियांचाही समावेश आहे.

सुधारित बातमी-- झारखंड व जम्मू काश्मिरात आज मतदानाचा शेवटचा टप्पा
र ंची/श्रीनगर-झारखंड व जम्मू काश्मीर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकरिता पाचवा व शेवटचा टप्पा २० डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. संथाल परगणातील १६ जागांकरिता कडेकोट बंदोबस्तात मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, विधानसभा अध्यक्ष शशांक शेखर भोक्ता व अनेक मंत्र्यांसह २०८ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे. यात १६ स्त्रियांचाही समावेश आहे.गुरुवारी दुपारी निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शांत झाली. निवडणूक प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी संथाल भागाचा दौरा केला. झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी पी.के. जाजोरिया यांनी सांगितले की, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. हा भाग नक्षलग्रस्त असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.जम्मू काश्मिरात निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यात विधानसभेच्या २० जागांकरिता मतदान केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. काश्मीरच्या जम्मू, कठुआ व राजौरी जिल्ह्यात हे मतदान घेतले जाईल. या मतदानासाठी अत्यंत कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला आहे. सुरक्षा जवानांच्या ४०० कंपन्या येथे तैनात केल्या असून एका कंपनीत १०० जवानांचा समावेश राहणार आहे. याव्यतिरिक्त जिल्हा पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.